Share

Maratha Reservation | मंत्रालयाला बसली मराठा आंदोलनाची झळ; मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड

🕒 1 min read Maratha Reservation | मुंबई: राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन अत्यंत पेटलं आहे. आरक्षणासाठी सुरू असलेलं  हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे. राज्यामध्ये जागोजागी जाळपोळ आणि दगडफेक होताना दिसत आहे. अशात या आंदोलनाची झळ मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरातील गाड्यांची तोडफोड झाली आहे. Related News for Youफडणवीस सरकारचा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | मुंबई: राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन अत्यंत पेटलं आहे. आरक्षणासाठी सुरू असलेलं  हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे.

राज्यामध्ये जागोजागी जाळपोळ आणि दगडफेक होताना दिसत आहे. अशात या आंदोलनाची झळ मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरातील गाड्यांची तोडफोड झाली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे. मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही तोडफोड केली असल्याची माहिती मिळाली आहे.

Hasan Mushrif’s car has been vandalized

मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी (Maratha Reservation) राज्यभर आंदोलन करताना दिसत आहे. त्यांचं हे आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललं आहे.

जोपर्यंत आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने स्पष्ट केली आहे. अशात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

अजय साळुंखे, संतोष निकम आणि दीपक सहानकोरे या तिघांनी आमदारस्थानी असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली असल्याची माहिती मिळाली आहे.

हे तिघे छत्रपती संभाजीनगरमधून आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

ST bus service stopped from Ratnagiri over Maratha reservation

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात जागोजागी जाळपोळ आणि दगडफेक होताना दिसत आहे.

तर काही ठिकाणी एसटी बस देखील फोडण्यात आल्या आहे. अशात राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून बस सेवा बंद केल्याची माहिती रत्नागिरी विभागाने दिली आहे.

रत्नागिरी विभागातून पुणे, बीड, कोल्हापूर, लातूर, बेळगाव इत्यादी भागांमध्ये जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आल्या आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या बस सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही