Maratha Reservation | देवेंद्र फडणीसांनी चिल्लर चाळे बंद करावे; आम्ही मागे हटणार नाही – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

उपोषणाच्या आठव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती जसजशी खालावत आहे, तसं-तसं मराठा आंदोलन तीव्र होत चाललं आहे.

मराठा समाजाचं आंदोलन हिंसक वळण घेत असून राज्यामध्ये जागोजागी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील बहुतांश ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चिल्लर चाळे बंद करावे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

तुम्ही ३० दिवस मागितले होते, मी ४० दिवस दिले. या ४० दिवसात तुम्ही काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या काळात सरकारकडून फारसे प्रयत्न न झाल्याने, शिवाय केवळ ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करू, अशी भूमिका सरकारने घेतल्यामुळे जरांगे पाटील संतापले आहेत.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. मला केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना नव्हे तर राज्यभरातील सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण हवे आहे. हे आंदोलन आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. आंदोलन उधळण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. या आंदोलनादरम्यान पोलीस यंत्रणा सरकारसोबत आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना देखील हे सरकार पोलिसांना सांगून मारहाण करीत आहे. यामागे उपमुख्यमंत्र्याचा डाव आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.

आंदोलन थांबविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत. आंदोलन बंद करण्याची भूमिका सरकारने घेतली असून ती समाजाला मान्य नाही. सरसकट आरक्षण द्या; अन्यथा आज संध्याकाळपासून आपण जलत्याग करणार आहोत. असे असे सांगत हे आंदोलन आता थांबणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारला मराठा समाजाला (Maratha Reservation) जाणून-बुजून आरक्षण द्यायचं नाही. राज्यातील वातावरण खराब करण्याची इच्छा सरकारची आहे, असं दिसून येत आहे.

इंटरनेट सेवा बंद करून राज्य सरकार चिल्लर चाळे करताना दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे चिल्लर चाळे बंद करायला हवे, कारण काही केलं तरी आम्ही मागे हटणार नाही.

सरकार आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आता ते शक्य होणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. इंटरनेट सेवा बंद केली असली तरी आम्हाला फरक पडत नाही.

कारण तुमच्या इंटरनेटपेक्षा मराठा समाज (Maratha Reservation) मोठा आहे. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. यापुढे देखील आम्ही शांततेत आंदोलन करू. आमच्या आंदोलनाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe