Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे दिवाळीपूर्वी एसटी बसचं निघालं ‘दिवाळ’; मराठा आंदोलनाचा एसटीला किती बसला फटका?

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या महिन्यापासून मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं हे आंदोलन सुरू आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मराठ्यांनी स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जागोजागी रस्ता रोको आंदोलन, दगडफेक आणि जाळपोळ होताना दिसत आहे.

तर राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी बस देखील फोडण्यात आल्या आहे. एसटी बसचं नुकसान केल्यामुळे एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी चांगलाच फटका बसला आहे.

Due to the Maratha reservation movement, ST bus lost 17 to 20 crores rupees

मराठा समाजाचं आंदोलन (Maratha Reservation) दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे एसटी बसचं सुमारे 17 ते 20 कोटी रुपयांचे नुकसान झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

एसटी बसचं नुकसान होत असल्यामुळे बहुतांश बस डेपोतून बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. अचानक बस फेऱ्या रद्द केल्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रवासी खाजगी वाहनांनी प्रवास करत आहे. तर अनेकांना आपला प्रवास रद्द करावा लागला आहे.

दरम्यान, कुणबी दाखल्याच्या पुराव्याच्या आधारे राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Maratha Reservation) द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

अशात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येने कुणबी दाखले सापडले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात जुने रेकॉर्ड तपासत असताना कुणबी दाखल्यांची नोंद सापडली आहे.

या ठिकाणी 25 पेक्षा अधिक दाखले सापडले आहे. यानंतर मराठा आंदोलन (Maratha Reservation) आणखी चिघळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.