Manoj Jarange | जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी ते गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. उपोषणाच्या 9 व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे.
अशात मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक उपोषण स्थळी दाखल झालं आहे. परंतु, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange’s agitation for Maratha reservation is going on
मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 9 वा दिवस आहे. उपोषणाच्या नव्या दिवशी त्यांनी पाणी पिणं बंद केलं आहे.
अशात मनोज जरांगे यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी अन्न, पाणी घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललेली असताना राज्य सरकार आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावर तोडगा काढत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारला मनोज जरांगे यांचा जीव घ्यायचा आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहे.
दरम्यान, मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha reservation) सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस पेटत चाललं आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी आज मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे.
आंदोलकांनी दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक रोखून धरली आहे. तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून पोलीस हा सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे साधारण चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलक आक्रमक; मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता रोको सुरू
- Maratha Reservation | मराठी रंगभूमीला बसला मराठा आंदोलनाचा फटका; आंदोलनामुळे मराठी नाट्यसंमेलन स्थगित
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे दिवाळीपूर्वी एसटी बसचं निघालं ‘दिवाळ’; मराठा आंदोलनाचा एसटीला किती बसला फटका?
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन चिघळणार? पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले
- Maratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? शिंदे-फडणवीसांचं शिष्टमंडळ जाणार भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










