Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. गेल्या महिन्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी या मुद्द्यावरून जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं होतं.
त्यानंतर हळूहळू हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं. तर सध्या हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यात जागोजागी रस्ता रोको आंदोलन, दगडफेक, जाळपोळ इत्यादी घटना घडताना दिसत आहे.
या घटनांनंतर बहुतांश ठिकाणी एसटी बस सेवा रद्द करण्यात आल्या आहे. तर या घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
मराठा समाजाचं आंदोलन (Maratha Reservation) दिवसेंदिवस पेटत चाललं आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे.
या महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, आंदोलकांनी दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक रोखून धरली आहे. त्याचबरोबर आंदोलक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर साधारण 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक कोंडी अजून किती वेळ चालेल? याबद्दल काही सांगता येत नाही.
Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan postponed due to Maratha reservation movement
दरम्यान, मराठी नाट्य रसिकांना मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा चांगलाच फटका बसला आहे. 05 नोव्हेंबर 2023 रोजी सांगलीमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडणार होतं.
या संमेलनाची नाट्य रसिक आतुरतेने वाट बघत होते. परंतु, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलनाला (Maratha Reservation) पाठिंबा देत सुधीर गाडगीळ यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठी रंगभूमीला बसला मराठा आंदोलनाचा फटका; आंदोलनामुळे मराठी नाट्यसंमेलन स्थगित
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे दिवाळीपूर्वी एसटी बसचं निघालं ‘दिवाळ’; मराठा आंदोलनाचा एसटीला किती बसला फटका?
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन चिघळणार? पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले
- Maratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? शिंदे-फडणवीसांचं शिष्टमंडळ जाणार भेटीला
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात वाढणार थंडीचा जोर, पाहा हवामान अंदाज