Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी राज्यभर आंदोलन करत आहे. त्यांचं हे आंदोलन दिवसेंदिवस हिंसक वळण घेताना दिसत आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक होताना दिसत आहे. या सर्व घटनांमुळे सांगलीत होणारं मराठी नाट्यसंमेलन स्थगित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरून नाट्यसंमेलन स्वागताध्यक्षपदी असणाऱ्या सुधीर गाडगीळ यांनी राजीनामा दिला आहे.
Sudhir Gadgil resigned supporting Maratha reservation
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य रसिक आतुरतेने वाट बघत असतात. अशात 5 नोव्हेंबर 2023 रोजी सांगलीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार होता.
परंतु, हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha reservation) सुरू असलेलं आंदोलन हिंसक वळण घेत असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याच्या चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे मराठा समाजाच्या (Maratha reservation) आंदोलनाला पाठिंबा देत सुधीर गाडगीळ यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून दिवसेंदिवस आक्रमक होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहे.
या सर्व घटनांमुळे एसटी बसचं सुमारे 17 ते 20 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या सर्व प्रकरणामुळे राज्यातील बहुतांश डेपोतून बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.
अचानक बस सेवा रद्द झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतं आहे. बस फेऱ्या बंद केल्यामुळे अनेक प्रवासी खाजगी वाहनांनी प्रवास करत आहे. तर अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे दिवाळीपूर्वी एसटी बसचं निघालं ‘दिवाळ’; मराठा आंदोलनाचा एसटीला किती बसला फटका?
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन चिघळणार? पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले
- Maratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? शिंदे-फडणवीसांचं शिष्टमंडळ जाणार भेटीला
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात वाढणार थंडीचा जोर, पाहा हवामान अंदाज
- Maratha Reservation | देवेंद्र फडणीसांनी चिल्लर चाळे बंद करावे; आम्ही मागे हटणार नाही – मनोज जरांगे