Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं आहे. तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परदेशात असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवरून राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे परदेशात असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

Vijay Wadettiwar cmmented on State Govt.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “परदेशात असलेल्या 50 ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने ते विद्यार्थी संकटात सापडले आहे.

हे विद्यार्थी सरकारच्या भरोशावर परदेशात गेले होते. परंतु, सरकारच्या गलथान कारभारामुळे या विद्यार्थ्यांपुढे जेवण, निवास इत्यादी खर्च कसा भागवायचा? असा सवाल उपस्थित झाला आहे.

राज्य सरकार कंपन्या आणि आमदारांना खुश करण्यात मग्न आहे. पण ते विद्यार्थ्यांना पैसे देत नाहीये. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जवळचे पैसे संपल्याने विद्यार्थी अत्यंत अडचणीत सापडले आहे.

विद्यार्थी उपाशी आहेत आणि सरकारला त्यांची काळजी नाही. या सर्व गोष्टी घडत असताना ओबीसी नेत्यांनी बघ्याच्या भूमिकेत राहू नये. मंत्रिमंडळात असलेल्या ओबीसी नेत्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.

संचालक कार्यालयातून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पैसे वितरित केले जातील, असं मंत्रालयातील अधिकारी सांगत आहे. मंत्रालयातील हे अधिकारी आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.