Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी मंत्र्याची मागणी

Maratha Reservation | बुलढाणा: महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं हे आंदोलन गेल्या आठवड्यापासून हिंसक वळण घेताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यात जाळपोळ, दगडफेक, रस्ता रोको आंदोलन, घरफोडी झाल्याच्या घटना घडताना दिसत आहे. अशात ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राज्यात एक प्रकारची खळबळ उडाली आहे.

Subodh Savji commented on Maratha Reservation

सुबोध सावजी 70-80 च्या दशकापासून आजपर्यंत राजकारणात सक्रिय आहे. अशात त्यांनी राज्यपालांकडे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

मराठा समाजाचा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा सुरू असताना सर्व पक्ष, सर्व जाती-धर्माचे लोक, कार्यकर्ते, मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

परिणामी राज्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसतं आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी अनेक तरुण आत्महत्या करताना दिसत आहे.

तर दुसरीकडे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं सुबोध सावजी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे.

आज त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे.  आज मनोज जरांगे तिघांचा आधार घेत कसे-बसे चालताना दिसले आहे. अशात राज सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणावर (Maratha Reservation) त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे.

कारण मनोज जरांगे यांची प्रकृती जर आणखीन बिघडली तर मराठा आंदोलन (Maratha Reservation) अजून तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.