Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांना लवकर निर्णय घेण्याची गरज; प्रकृती बिघडली असताना जरांगे तिघांचा आधार घेत कसेबसे चालले

Maratha Reservation | जालना: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.

आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. उपोषणाच्या 9 व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज त्यांना चालता देखील येत नव्हतं. अशात जसजशी मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडत चालली आहे तसंतसं मराठा समाज आक्रमक होत चालला आहे.

मराठा समाजाचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे. आंदोलकांकडून राज्यात बहुतांश ठिकाणी जाळपोळ, दगडफेक, गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

या घटना घडत असताना मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीन खराब झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Manoj Jarange’s agitation for Maratha reservation is going on

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण सुरू आहे.

उपोषणाच्या 9 व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असून तिघांचा आधार घेत मनोज जरांगे कसे-बसे चालले आहे. उपोषण स्थळी मनोज जरांगे यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक दाखल झालं आहे.

परंतु, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत उपचार, अन्न, पाणी काहीच घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे आता मनोज जरांगे यांची प्रकृती अजून बिघडण्याच्या आधी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

Pallavi Manoj Jarange commented on Maratha Reservation

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणावर त्यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “मराठा समाजासोबत कुणीही गद्दारी करू शकतं. मात्र, माझे पप्पा समाजासोबत गद्दारी करू शकत नाही.

पप्पांनी पाणी प्यावं, जेवण करावं, असं आम्हाला सातत्याने वाटतं. परंतु पप्पा म्हणतात, मी पाणी पिलं, जेवण केलं तर समाजासोबत गद्दारी होईल. सरकारने माझ्या पप्पांची काळजी घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण (Maratha Reservation) द्यायला हवं.

कारण मला सारखं वाटतं की पप्पांनी घरी असावं माझ्यासोबत खेळावं. पण ते घरी आले तर ते आमच्याशी बोलत नाही. कारण त्यांच्या डोक्यात सतत मराठा आरक्षणाचा विषय असतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.