Maratha Reservation | पप्पा घरी असावे त्यांनी आमच्यासोबत खेळावं असं आम्हाला सारखं वाटत; मनोज जरांगेंची लेक भावूक

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे लढा उभा केला होता.

गेल्या महिन्यात त्यांनी तब्बल 17 दिवस आमरण उपोषण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती.

परंतु, या कालावधीमध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहे.

आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. अशात मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलत असताना त्यांची मुलगी पल्लवी जरांगे भावुक झाली आहे. मराठा समाजासोबत माझे बाबा गद्दारी करणार नसल्याचं पल्लवी जरांगे हिने म्हटलं आहे.

Pallavi Manoj Jarange commented on Maratha Reservation

मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे म्हणाली, “पप्पांनी जेवण करावं पाणी प्यावं, असं आम्हाला सारखं वाटत असतं. मी जेवण केलं किंवा पाणी पिलं तर समाजासोबत गद्दारी होईल, असं माझ्या पप्पांचं म्हणणं आहे.

मराठा समाजासोबत कुणीही गद्दारी करू शकतं. मात्र, माझे पप्पा गद्दारी करू शकत नाही. त्यामुळे सरकारने माझ्या पप्पांची काळजी घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण (Maratha Reservation) घ्यावं.

पप्पा घरी असावे, त्यांनी आमच्या सोबत खेळावं असं मला सारखं वाटत असतं. मात्र, ते घरी आले तर ते आमच्याशी बोलत नाही. कारण त्यांच्या डोक्यात सतत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय सुरू असतो.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला रवाना झालं आहे.

राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात उदय सामंत, संदिपान भुमरे, धनंजय मुंडे, अतुल सावे यांच्यासह राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, निवृत्ती न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव यांचा समावेश आहे.

राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहे. त्याचबरोबर ती लोक मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) कायदेशीर बाजू समजून सांगणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.