Ajit Pawar | अदानी प्रकरणावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | सातारा : सध्या अदानी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात शरद पवार पाठराखण करत असल्याचा चर्चा रंगत आहेत. यामुळे मविआ मध्ये फूट पडू शकते असं देखील म्हटलं जात आहे. तर आज (10 एप्रिल) विविध कार्यक्रमासाठी विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानी माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी अदानी प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, अदानी उद्योगसमूहाच्‍या (Adani Group) अनुषंगानं आलेल्‍या हिंडेनबर्ग अहवालाची (Hindenburg Report) चौकशी करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने समिती नेमण्‍यास मान्‍यता दिली. त्‍यानुसार ती नेमल्‍यानंतर वस्‍तुस्‍थिती समोर येईल. तोपर्यंत कोणीही कोणालाही आरोपीच्‍या पिंजऱ्यात उभं करणं बरोबर नाही अस मत अजित पवार नोंदवलं. याचप्रमाणे त्यांनी जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मविआचे समर्थक, पाठीराखे म्‍हणून एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्‍याचा विश्‍‍वास देखील दर्शवला.

दरम्यान, माध्यमांनी जेव्हा त्यांना अदानी समूहाच्‍या अनुषंगानं माजी खासदार राहुल गांधी यांच्‍यासह इतर विरोधी पक्षांनी संयुक्‍त संसदीय समितीच्‍या स्थापनेची मागणी केली असून, त्‍या भूमिकेला छेद देणारे मत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी यांची पाठराखण करत मांडल यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते का? याबाबत स्पष्टपणे नाही म्हणत त्यांनी शरद पवार हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याचं देखील म्हटलं आहे. यामुळे आता शरद पवारांननंतर अजित पवार देखील अदानी समूहाची पाठराखण करतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याचप्रमाणे अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या आयोध्या दौऱ्यावर देखील भाष्य करत म्हटलं की, प्रत्‍येकाची श्रद्धास्थानं असतात. त्‍यानुसार ते त्‍या त्‍या ठिकाणी जात असतात. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्‍येला गेले आम्‍ही त्‍यांना दौऱ्यासाठी शुभेच्‍छा देखील दिल्या. परंतु सध्या शेतकऱ्याच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देणं गरजेच आहे.

महत्वाच्या बातम्या-