Devendra Fadnavis | “ठाकरेंनी सगळ्यात मोठी फसवणूक केली कारण त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढल्या”

Devendra Fadnavis | पुणे : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप या पक्षांमध्ये फुटाफुटी आणि गद्दारी यावरुन तुफान खडाजंगी सुरु आहे. यावरुन सत्ताधारी विरोधक एकमेकांमध्ये भिडल्याचे नेहमी पहायला मिळतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आता मोठं वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना-भाजपची युती तुटल्याचं कारण फडणवीसांनी सांगितलं आहे.

 निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत छुपी युती केली

“उद्धव ठाकरेंनी सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय याकरता होता की त्यांच्या मनातली सूप्त इच्छा होती ती मुख्यमंत्री होण्याची. त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याचा कधीच शब्द दिला नव्हता. निवडणुकीच्या आधी त्यांनी छुपी युती उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत केली. नंबर्स जसे आले तेव्हा त्यांना कळलं की तीन पक्ष एकत्र आले की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो. निकालाच्या दिवशीच ते आमच्यापासून वेगळे झाले. त्यांनी तसे संकेत दिले. ‘युतीत 25 वर्षे सडली’ असं उद्धवजी म्हणाले होते. पण अडीच वर्षात तर ते संपले”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

“आम्हाला उद्धव ठाकरेंनी धोका दिला” (Devendra Fadnavis says Uddhav Thackeray threatened us’)

“राजकारणात जेव्हा तुमच्यासोबत दगा होतो, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात जिवंत रहावं लागतं. आम्हाला उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे समजल्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली. त्यानंतर गोष्टी कशा घडल्या ते तुम्ही, महाराष्ट्राने पाहिलंच आहे. काही वाक्यं मी बोललो त्याचा अर्थ माध्यमांना लावता आला नाही. काही वाक्यं शरद पवार बोलले त्याचाही अर्थ माध्यमांना लावता आला नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“ठाकरेंनी आमच्यासोबत लढल्या होत्या याचा त्रास जास्त”

“अजित पवार जे आले तेव्हा प्रामाणिकपणे आले होते. त्यांनी आम्हाला फसवलं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसने स्ट्रॅटेजी बदलली. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार येऊन टिकलं नाही. त्यावेळी तो निर्णय आम्ही फसवणुकीतून घेतला होता. उद्धव ठाकरेंनी मोठी फसवणूक केली असंच मी म्हणेन कारण त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढल्या होत्या याचा त्रास जास्त होतो. कारण सोबत राहून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात होते तेव्हा त्यांना अडवणारे एकनाथ शिंदे होते. मला तेव्हा एकनाथ शिंदेंनी अस्वस्थ होऊन फोन केला होता की तुम्ही एकदा मातोश्रीवर येऊन जा सगळा विषय संपेल. मात्र एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून अस्वस्थ झाले होते. तीन पक्षाचं सरकार चालवणं कठीण होतं”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

“मग पवारसाहेबांनी राष्ट्रपती राजवट का लागली? हे पण सांगाव”

राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं असे संकेत होते का? यावरही देवेंद्र फडणवीस म्हणाले की “असं काही होतं असं मला मुळीच वाटत नाही. जे मी सांगितलं आहे ते सत्यातलं अर्ध सांगितलं. राष्ट्रपती राजवट त्यावेळी लावण्याचा सल्ला कुणी दिला होता. राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी मी हे केलं असे जे पवारसाहेब सांगतात राष्ट्रपती राजवट का लागली? हे पण त्यांनी सांगावं”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-