Eknath Shinde | “आमच्यावर कृष्णकाठी प्रायश्चित घेण्याची वेळ कधी आली नाही”; मुख्यमंत्र्यांची अजित पवारांना कोपरखळी

Eknath Shinde | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा लाऊडस्पीकरचा प्रचाराची वेळ आजपासून थांबली आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. या वाहन रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना टोला लगावला आहे.

Eknath Shinde Comment On Ajit Pawar

“जेव्हा शेतकरी पाणी मागतो त्यावेळेस हे काय म्हणतात? मी यावर फार काही बोलत नाही. परंतु अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? अजित पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते, रोड शो करायची काय गरज असते? हा एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता आहे, लोकांना भेटणारा माणूस आहे, तोंड लपवून पळणारा नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“कृष्णकाठी प्रायश्चित घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही”- Eknarh Shinde

“आम्ही लोकांना सामोरं जाणार आहोत. आम्ही असं चुकीचं काही बोलत नाही, की कृष्णेच्या काठावर जाऊन प्रायश्चित घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही, येणार नाही”, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना चांगलीच कोपरखळी मारली आहे.

“मतदारसंघातील मतदारांनी सढळ हस्ते रासनेंना आशीर्वाद”

“असंख्य लोक आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर उभा होते, हे खरं म्हणजे दुर्लभ आणि दुर्मिळ असं चित्र या दिवशी आज पाहायला मिळालं. त्याबद्दल या संपूर्ण कसबा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण, आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी काही कमी ठेवलं नाही. सढळ हस्ते अगदी मनापासून आमचे हेमंत रासने यांनी त्यांनी आशीर्वाद दिले”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“सर्व वयोगटातील लोक हेमंत रासने यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. 26 तारखेला हेमंत रासने यांना मतदार भरभरून मतदान करतील आणि हेमंत रासने यांना प्रचंड मताधिक्क्याने सर्व विक्रम मोडीत काढून विजयी करतील. असं चित्र आज पाहायला मिळालं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-