Share

Uddhav Thackeray | ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग; भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला गेल्याने ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील अनेक अडचणी यामुळे वाढल्या आहेत. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या हातातून गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला गेल्याने ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील अनेक अडचणी यामुळे वाढल्या आहेत.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या हातातून गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात लढत आहेत. याशिवाय ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्यासाठी इतर विरोधी पक्षांची मदत घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीच आज मुंबईत मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

Arvind Kejariwal will meet Uddhav Thackeray

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी केजरीवाल मुंबईत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी केजरीवाल येणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपला एकटं पाडण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न

भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपला एकटं पाडायचं असेल तर देशभरातील विरोधकांनी एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून रणनीती आखली जात असल्याचं स्पष्ट होतंय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान हे मुंबईत येत आहेत.

दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट

उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची ही राजकीय बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्रातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी विरोधी आघाडी तयार करण्याबाबतदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात विरोधकांची एकजूट करण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही