Eknath Shinde | ‘आले रे आले गद्दार आले’; पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत घोषणाबाजी

Eknath Shinde | पुणे : पुण्याच्या कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले. शिंदे हे कसब्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभागी झाले होते. कसब्यात भाजपचे हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणार आहेत.

“आले रे आले गद्दार आले”

हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला. यावेळी शिंदे यांनी गळ्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे चिन्ह असलेले उपरणे घातले होते. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली होती. या रॅलीत ‘आले रे आले गद्दार आले’, अशी घोषणा देण्यात आली. घोषणा देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसब्यात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत ‘आले रे आले गद्दार आले’ अशा घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, घोषणा देणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम कसब्यात फेरी काढली होती. फडणवीस यांनी भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या नारायण पेठ, शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ या प्रमुख पेठांमधून सायंकाळी फेरी काढली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्व भाग ढवळून काढणार आहेत. शिवाजी रस्त्याच्या पलीकडच्या भागात म्हणजे पूर्व कसब्यात मुख्यमंत्र्यांची रॅली आयोजित करण्यात आली आहे. या भागात प्रामुख्याने बहुजन समाजाचा मतदार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित या फेरीला सुरवात झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.