Share

Maratha Reservation | राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंचं उपोषण मागे घेण्यात यशस्वी ठरणार? सरकारच्या शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा सुरू

Maratha Reservation | जालना: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे (Manoj Jarang) मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. उपोषणाच्या 9 व्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली दिसत आहे. जसजशी मनोज जरांगे यांची प्रकृती खराब होत आहे, तसं-तसं मराठा आंदोलन आणखी चिघळतना दिसत आहे. अशात या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं … Read more

Published On: 

Maratha Reservation | जालना: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे (Manoj Jarang) मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे.

आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. उपोषणाच्या 9 व्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली दिसत आहे. जसजशी मनोज जरांगे यांची प्रकृती खराब होत आहे, तसं-तसं मराठा आंदोलन आणखी चिघळतना दिसत आहे.

अशात या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं आहे.

Manoj Jarange is on hunger strike for Maratha reservation

मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ उपोषण स्थळी दाखल झालं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेल. परंतु, एक-दोन दिवसात कोणतेही आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसतं. कायदेशीर बाबींसाठी थोडा वेळ देणं गरजेचं असतं, असं राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना सांगितलं आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारचं  शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) कायदेशीर बाजू समजून सांगत आहे.

राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, अतुल सावे यांच्यासह राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे, निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव यांचा समावेश आहे.

Gunaratna Sadavarte filed a petition against the movement of the Maratha community

दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आंदोलनाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

त्यांच्या या याचिकेनंतर मराठा समाज आणखीन (Maratha Reservation) आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही