Maruti Suzuki Car | भारतामध्ये मारुती सुझुकी Jimny 5-Door लाँच, जाणून घ्या फीचर्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maruti Suzuki Car | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन फीचर्ससह कार लाँच (Car Launch) करत असते. अशात ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये कंपनीने जिमनी 5-डोअर (Jimny 5-Door) कार लाँच केली आहे. या कारची विक्री सर्वप्रथम भारतामध्ये केली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू या कारची इतर बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाईल. कंपनीने आजपासून या कारची बुकिंग सुरू केली आहे.

जिमनी 5-डोअर डिजाईन

जिमनी 5-डोअर या कारचे डिझाईन परदेशात विकल्या जाणाऱ्या छोट्या 3-डोअर मॉडेलसारखे करण्यात आली आहे. या गाडीमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाही. यामध्ये अतिरिक्त दोन दरवाजे उपलब्ध आहे. यामध्ये एका लांब व्हीलबेसशिवाय मागील क्वॉर्टर पुन्हा डिझाइन करण्यात आले आहे.

जिमनी 5-डोअर फीचर्स

जिमनी 5-डोअर ही कार 3-डोअर मॉडेलपेक्षा 340mm लांब आहे. या गाडीची रुंदी 1645 मिमी आणि उंची 1720 मिमी आहे. या गाडीमध्ये मागील दरवाजाला इश क्वार्टर ग्लाससह रियल ग्लास देखील देण्यात आला आहे. या कारमध्ये जिमनी 5-डोअरला मारुतीची स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो आणि अर्कामिन साउंड सिस्टम मिळते. या वाहनात तुम्ही 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्टसह ESP, हिल डिसेंट कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहे.

इंजिन

जिमनी 5-डोअर ही कार K15C इंजिन वर चालते. यामध्ये जुन्या K15B इंजिनसह 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक किंवा 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले इंजिन उपलब्ध असू शकते. या गाडीमध्ये मारुतीचे माईल्ड हायब्रीड तंत्रज्ञान उपलब्ध असू शकते.

महत्वाच्या बातम्या