MS Dhoni | जगात भारी ‘Thala’ ची एन्ट्री! DJ झेननी सांगितला अवाक करणारा किस्सा

MS Dhoni | चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. काल (23 मे) पासून आयपीएलचे क्वालिफायर सामने सुरू झाले आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) वर विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. या मॅचमधील महेंद्रसिंग धोनीचा एन्ट्री व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

DJ Zen told the story of MS Dhoni’s entry

कालच्या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) मैदानावर येताचं सगळीकडे उत्साहात वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी डीजे झेन (DJ Zen) मैदानावर उपस्थित होता. त्याने धोनीच्या एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या आत्तापर्यंत 23,567,743 व्ह्यूज आले आहे.

या व्हिडिओनंतर डीजे झेनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “रजनीकांत हा तमिळनाडूचा भाई आहे. तो तेथील लोकांना आपला वाटतो. त्याचप्रमाणे धोनी (MS Dhoni) देखील त्या लोकांना आपला वाटतो. धोनीला मैदानावर बघण्यासाठी लोक आतुरलेले असतात. त्याचबरोबर त्याने खेळत राहावं असं त्याच्या फॅन्सना वाटत आहे.

दरम्यान, चेन्नईविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना हरल्यानंतर गुजरातला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. गुजरात आपला दुसरा क्वालिफायर (IPL) सामना 26 मे रोजी शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.