Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणामध्ये दररोज काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sanjay Shirsat alleges against Aditya Thackeray
माध्यमांशी बोलत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “वरळी मतदारसंघाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी आहेत. त्यांनी कोट्यावधींची बिलं उचलली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी एकही काम झालेलं नाही.”
पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे. वरळीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं मी त्या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. या सर्व प्रकरणाला राजकीय पाठिंबा असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करावी.”
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | 1 डॉट बॉल 500 झाडं! Tata चा आयपीएलच्या माध्यमातून मोठा उपक्रम
- IPL 2023 | ‘या’ संघांनी खेळले आहे सर्वाधिक IPL Finals
- HSC Result | उद्या होणार 12 वीचा निकाल जाहीर! निकाल पाहण्यासाठी करा ‘या’ स्टेप्स फॉलो
- Elon Musk | भारतात लवकरच टेस्टलाचा जलवा; एलोन मस्कने दिली माहिती
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्यानं चर्चांना उधान