IPL 2023 | ‘या’ संघांनी खेळले आहे सर्वाधिक IPL Finals

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आयपीएलचे क्वालिफायर सामने सुरू झाले आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमने-सामने आले होते. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली पहिला क्वालिफायर सामना जिंकत चेन्नई फायनलमध्ये पोहोचली आहे. त्याचबरोबर चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक आयपीएल फायनल्स खेळले आहे.

‘These’ teams have played in most IPL Finals

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 14 आयपीएल (IPL) चे हंगाम खेळले आहे. त्यापैकी दहा हंगामामध्ये सीएसकेने अंतिम फेरी गाठली आहे. चेन्नई खालोखाल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे नाव आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सहा फायनल्स खेळले आहे.

या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विराजमान आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सने आतापर्यंत तीन वेळा आयपीएल (IPL) फायनल्स खेळले आहे. त्याचबरोबर या यादीत चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) चे नाव आहे. आरसीबीने तीन वेळा फायनल्स खेळले आहे.

दरम्यान, चेन्नईविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना हरल्यानंतर गुजरातला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. गुजरात आपला दुसरा क्वालिफायर (IPL) सामना 26 मे रोजी शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.