Elon Musk | भारतात लवकरच टेस्टलाचा जलवा; एलोन मस्कने दिली माहिती

Elon Musk | टेस्ला (Tesla) ही एक जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक गाड्या बनवणारी कंपनी आहे. याचे सीईओ एलोन मस्क (CEO Elon Musk) असून त्यांनी या टेस्ला कंपनीच्या ब्रँडिंगसाठी भरपूर कष्ट घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर याच टेस्ला कंपणीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये टेस्ला (Tesla) भारतातील कारखान्यात आपलं स्थान निश्चित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Elon Musk Shows Interest In India Factory

तसचं ईव्ही मेकर टेस्लाचे सीईओ (CEO) एलोन मस्क (Elon Musk) यांनी मंगळवारी ( 23 मे ) एका कार्यक्रमादरम्यान जाहीर केलं आहे की, कंपनी आपल्या नवीन कारखान्यचं स्थान निवडण्यासाठी जागा शोधत असून येत्या काही महिन्यात भारतात स्थान निश्चित करेल असं अपेक्षित आहे. याचप्रमाणे अनुकूल आयात कर सुरक्षित करण्याच्या आव्हानांमुळे कंपनीने देशात इलेक्ट्रिक कार ( Electric Car) आणण्याची योजना थांबवल्यानंतर टेस्लाने भारतावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रिलायन्स, जिओ या कंपन्यादेखील टेस्लासोबत गुंतवणूक करायला तयार असल्याची माहिती मिळत आहे.  कारण टेस्ला भारतात एक उत्पादन कारखाना स्थापन करणार असल्याने याचा फायदा या दोन्ही कंपन्यांना देखील होणार आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स, जिओने (Jio) फक्त टेस्लाच्या कारखान्यासाठी कॅप्टिव्ह प्रायव्हेट नेटवर्क तयार करून नेटवर्कची गती सक्षम करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती मिळतं आहे. याचप्रमाणे लवकरच टेस्लाचे वरिष्ठ अधिकारी भारत सरकारच्या अधिकार्‍यांशी चर्चा करणार असून टेस्लाचे देशासोबतचे संबंध आणखी मजबूत करुन भारतात टेस्ला सारख्या बँड निर्माण करण्यासाठी ही बैठक असल्याच बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-