Kranti Redkar | “पापाचा घडा…” ; समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला व्हिडिओ

Kranti Redkar | सध्या सीबीआयच्या (CBI) रडारवर असणारे NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नीने म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तिने अप्रत्येक्षपणे सध्या समीर वानखेडे यांची सीबीआय (CBI) चौकशी सुरू असल्याने व्हिडिओ द्वारे टोला लगावलेला पाहायला मिळतं आहे.

चांगुलपणावरच हे जग चालते –

तसचं क्रांती रेडकर (Kranti Redkar) व्हिडीओमध्ये मधून तिच्या आज्जीने सांगितलेली गोष्ट सांगत असल्याचं पाहायला मिळतं आहे. क्रांती रेडकर (Kranti Redkar) म्हणते की, फार वर्षांपूर्वी माझ्या आज्जीनं मला एक अशीच चांगुलपणाबद्दल गोष्ट सांगितली होती. ती आजही माझ्या लक्षात आहे. ती अशी होती की, या जगात तुमच्या सोबत छळ, कपट करणारी अनेक माणसं आहेत. तुमचा चांगुलपणा इथं टिकून दिला जातं नाही. जी लोक चांगलं काम करतात त्यांना सतत दाबण्याचं काम केलं जातं. परंतु, एक दिवस अशा वाईट आणि खोट्या लोकांचा पापाचा घडा भरतो तेव्हा मात्र शिव भगवानाला पृथ्वीवर यावं लागत. असं कांती रेडकर (Kranti Redkar) आपल्या व्हिडिओमधून सांगत आहे.

https://www.instagram.com/reel/CslByF9NS69/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Kranti Redkar share video

दरम्यान, पुढे ती म्हणते की, ज्या वेळी अशी परिस्थिती येते तेव्हा मात्र भगवान शिव प्रलय करणारला सुरुवात करणार तेवढ्यात त्या ठिकाणी श्रीराम येतात आणि म्हणतात भगवान शिव तुम्ही या ठिकाणी प्रलय करू नका कारण तुम्ही जर असा प्रलय केला तर या ठिकाणी जी चांगली, सत्य परिस्थिती जगणारी, चांगुलपणा असणारी माणसं आहेत ती देखील या प्रलयात नष्ट होतीय. त्यांच्या चांगुलपणावरच आज हे जग चालते. यानंतर भगवान शिव प्रलय करण्याच थांबवतात. म्हणजे तात्पर्य इतकंच की, विचार करा, फार कमी लोक या वाटेने चालत आहेत. यामुळे आपण सत्याच्या,चांगुलपणाच्या वाटेने जायचं की नाही याचा विचार करा? असं देखील कांती रेडकर (Kranti Redkar) म्हणाली आहे. तिच्या या व्हिडिओमधून ती अप्रत्येक्षपणे म्हणतं आहे की, जे काही आरोप तिच्या नवऱ्यावर लावण्यात आले आहेत. त्याला चांगुलपणाच्या आणि सत्याच्या मार्गाने जिंकणार. तिच्या या व्हिडिओवर अनेक कंमेंट दिल्या जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-