Ajit Pawar | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि मंदिरातील प्रथेबाबत दावे-प्रतिदावे करत होते. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असं स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Ajit Pawar’s explanation about Trimbakeshwar temple tradition
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “कसली प्रथा नाहीये? तुम्ही त्रंबकेश्वरला जा. मी छगन भुजबळ आणि हिरामण खोसकर यांच्यासोबत बोललो आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांशी मी संवाद साधला आहे. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, ही शंभर वर्ष जुनी परंपरा आहे. मात्र, ते बाहेरच्या बाहेर जातात आतमध्ये येत नाही. काही ठिकाणी प्रथा-परंपरा असतात.”
पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “कुणी काय पाळावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, या गोष्टीचा भावनिक मुद्दा करू नका. यामध्ये राजकारण आणू नका. जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं काही करू नका, असं आम्ही आवाहन करतो.”
What exactly happened in Trimbakeshwar?
मुस्लिम धर्मियांकडून भरवण्यात येणारा उरूस आणि त्यानिमित्ताने मंदिरामध्ये धूप दाखवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात आला होता. मात्र, मंदिर प्रशासनाने हा दावा फेटाळत या विरोधात तक्रार दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या
- Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर घराणेशाहीचा आरोप; मुलगी श्रीजयाचे लावले भावी आमदार म्हणून पोस्टर
- Bacchu Kadu | जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं; मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची टीका
- CSK vs GT Qualifier 1 | पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचं लक्ष
- Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे
- Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा