CSK vs GT Qualifier 1 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलचे प्लेऑफ सामने आजपासून सुरू होणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या संघामध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये पाच खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागणार आहे.
All eyes are on ‘these’ five players in the first qualifier
महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)
आजच्या सामन्यामध्ये (CSK vs GT Qualifier 1) सर्वांच्या नजरा महेंद्रसिंग धोनीवर असणार आहे. कारण महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते. त्याचबरोबर धोनी चेपॅकमध्ये शेवटचा सामना खेळताना दिसू शकतो, असा अंदाज देखील फॅन्सकडून बांधला जात आहे.
शिवम दुबे (Shivam Dubey)
चेन्नई सुपर किंग संघातील स्फोटक फलंदाज शिवम दुबे यंदाच्या मोसमात वेगळ्या शैलीत खेळताना दिसला. आयपीएल 2023 मध्ये शिवमने अनेक लांब शॉट मारले आहे. त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा शिवम दुसरा फलंदाज ठरला आहे.
ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad)
ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने या आयपीएलमध्ये 28 षटकार ठोकले आहेत.
शुभमन गिल (Shubman Gill)
गुजरात टायटन्सला प्लेऑफपर्यंत (CSK vs GT Qualifier 1) नेण्यामध्ये शुभमन गिल मोठा वाटा आहे. या आयपीएल हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा गिल दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामामध्ये आत्तापर्यंत 680 धावा केल्या आहेत.
राशिद खान (Rashid Khan)
राशिद खानने या आयपीएल हंगामामध्ये गुजरात टायटन्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत 24 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर पर्पल कॅपधारक मोहम्मद शमीच्या नावावरही 24 विकेट आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे
- Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा
- Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
- Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटीलांवर नाराज आहे का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार