Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा ( Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. याबाबतच आज ( 23 मे) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार : अजित पवार

माध्यमांशी बोलताना अजित पवार ( Ajit Pawar) म्हणाले की, अशा चर्चा प्रत्येक पक्षात होत असतात. परंतु, शेवटी अंतिम निर्णय हा त्या पक्षातील सर्वोच्च नेते घेत असतात यामुळे महाविकास आघाडीबाबत देखील पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेतील आणि त्याची अंमलबजावणी पक्षातील नेते करतील. तसचं महाविकास आघाडी आगामी निवडणूक एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार असा प्रश्न माध्यमांनी विचारला तेव्हा अजित पवार म्हणाले, “स्टॅम्प आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार”. अशी ठाम भूमिका अजित पवारांनी ( Ajit Pawar) मांडली आहे.

No discussion on seat sharing yet – Ajit Pawar

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, कोणीही महाविकास आघाडीबाबत वेगळा अर्थ काढू नये. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तसाच आम्हाला देखील मत मांडण्याचा अधिकार आहे. मविआची ऐकी टिकून राहावी म्हणून तिन्ही पक्षांचे जेष्ठ नेते निर्णय घेतील. याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून एकमेकांवर टीका- टिपण्णी पाहायला मिळत आहे. याबाबत विचारल असता, अजित पवार ( Ajit Pawar) यांनी संगीतल, जागावाटपाबाबत अजून काहीच ठरलेलं नाही. परंतु महाविकास आघाडी एकत्र राहील.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.