Bacchu Kadu | जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं; मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची टीका

Bacchu Kadu | अमरावती : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे- फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तराबाबत हालचाली सुरू केल्या. परंतु, हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यासंदर्भात मिश्किल टीका केली आहे. सध्या त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

Bacchu Kadu Commented On Cabinet expansion

माध्यमांशी बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले की, “जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. जरी मंत्री झालो नसलो तरी काम करतोय. पण मंत्री झालो तर आणखी वेगानं काम करेनं.” अशी मिश्किल टीका बच्चू कडू
(Bacchu Kadu) यांनी केली आहे.

दरम्यान, आता तरी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. हा विस्तार तातडीनं व्हावा अशी सर्वांची ईच्या आहे. कारण प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं आवश्यक आहे ही जनतेची मागणी आहे. असंही देखील बच्चू कडू म्हणाले. याबाबत अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. सरकार स्थापन होऊन अकरा महिने झाले तरीही अजूनही रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.