HSC Result | टीम महाराष्ट्र देशा: बारावीच्या निकालाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या म्हणजेच 25 मे रोजी 12 वी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची वाट बघत होते.
बारावीचा (HSC Result) निकाल उद्या (25 मे) दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध होणार आहे. हा निकाल बघण्यासाठी विद्यार्थी खालील स्टेप्स फॉलो करू शकतात.
Follow these steps to see the HSC results
- विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या http://mahresult.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल.
- सीट नंबर आणि जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
- त्यानंतर तुम्ही निकालाची प्रिंट आऊट काढू शकतात.
विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन निकाल (HSC Result) बघू शकतात. तर निकाल लागल्यानंतर काही दिवसात विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजनल मार्कशीट त्यांच्या कॉलेजमध्ये मिळतील.
महत्वाच्या बातम्या
- Elon Musk | भारतात लवकरच टेस्टलाचा जलवा; एलोन मस्कने दिली माहिती
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्यानं चर्चांना उधान
- Kranti Redkar | “पापाचा घडा…” ; समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला व्हिडिओ
- Sanjay Raut | नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा बहिष्कार – संजय राऊत
- Mobile Number | सरकारचा नवीन नियम! शॉपिंग करताना मोबाईल नंबर देणं सक्तीचं नाही