Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत

Rahul Gandhi | दिल्ली: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपवर सडेतोड टीका करण्यात आली आहे. याबाबत राहुल गांधींनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gandhi’s tweet in discussion

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रित केलं नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, “राष्ट्रपतींनी संसदेचे उद्घाटन न करणे किंवा त्यांना या समारंभासाठी निमंत्रित न करणे हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे. संसद ही अहंकाराच्या विटांनी बनलेली नाही, तर ती घटनात्मक मुल्यांनी बनलेली आहे.”

दरम्यान, संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असताना सेंट्रल व्हिस्टा का उभारलं आहे? आपली जुनी संसद आणखी शंभर वर्ष टिकेल इतकी बळकट आहे. तरीही नवीन संसद उभारली गेली. 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. राहुल गांधींसह (Rahul Gandhi) आमचा या कार्यक्रमास बहिष्कार आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “नवीन इमारत तयार करून सरकारने काय साध्य आहे? या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते का होत नाही? काँग्रेससह आम्ही देखील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत.”

महत्वाच्या बातम्या