Bank of India | जॉब अलर्ट! बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

बँक ऑफ इंडिया (Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये क्रेडिट ऑफिसर (GBO) 350 आणि IT ऑफिसर (SPL) 150 पदांच्या जागांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Bank of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Bank of India) सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये फी भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 19 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/13zZamnRQmujJdJQ2KXJDKdaY4mfZlzjO/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://bankofindia.co.in/

महत्वाच्या बातम्या