MPSC Recruitment | एमपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्यामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2022 आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

एमपीएससी (MPSC Recruitment) यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 378 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये वनक्षेत्रपाल, गट ब 13 जागा, उप संचालक, कृषि व इतर गट-अ 49 जागा, तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ 100 जागा, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब 65 जागा, सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 102 जागा, सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 49 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (MPSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी (MPSC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 मार्च 2023 पासून ते 20 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. या परीक्षेसाठी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे परीक्षा केंद्र असणार आहे.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Kr8i3Dr-oVR0PXAwagVt-djBFTvnBmXA/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://mpsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe