Abhijeet Bichukle | “कसब्यातली भाजपची सत्ता काँग्रेसला गेली हा माझा पायगुणच”

Abhijeet Bichukle | पुणे: महाराष्ट्रात कसबा निवडणूक होऊन दोन दिवस झाले आहेत. तरीही अजून कसबा निवडणुकीच्या चर्चा सुरूच आहेत. कसबा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा 11 हजार मतांनी विजय झाला आहे. याआधी कसबा मतदारसंघात भाजपची सत्ता होती. आता त्या जागेवर महाविकासआघाडीने आपलं स्थान निश्चित केलंय. यावेळी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांच्या मतांची हाफ सेंच्युरी हुकली आहे. याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. “कसब्यातील भाजपची सत्ता माझ्याच पायगुणामुळे काँग्रेसला गेली” असल्याचं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

काय म्हणाले अभिजित बिचुकले?

यावेळी बोलताना त्यांना मिळालेल्या मतांबद्दल सांगितलं. अशावेळी ते म्हणाले की, “मी इथला रहिवासी नाही. तरीही त्या मनाने अधिक मतं आहेत.” त्यानंतर अभिजित बिचुकले एवढे प्रसिद्ध असूनही फक्त ४७ मतं कशी? असा प्रश्न विचारल्यानंतर बिचुकले म्हणाले, “मग मी जनतेला काय शिव्या देऊ का?” असा उलट प्रश्न त्यांनी माध्यमाला केला आहे.

अभिजीत बिचुकले का निवडणूक लढतात?

“संविधानाने आपल्याला प्रत्येक अधिकार दिला आहे. लोकशाही ही सर्वांसाठी आहे. लोकशाहीचा मार्ग जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणूक लढतो” असे उत्तर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे.

काय आहे बिचुकलेंचं पुढचं मिशन? ( What’s Future Planning Of Bichukle ?)

याआधी बिचुकले वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरेंविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून लढले. तर सातारा विधानसभा येथे त्यांनी निवडणूक लढवली. परंतु या ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं. यानंतर त्यांनी कसबा पोटनिवडणूक लढवली आहे.

बिचुकले आता पुढील प्लॅनिंग देखील करत आहेत. हे प्लॅनिंग त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. “पुढील मिशन हे २०२४ मध्ये सातारा विधानसभेचं असेल. लेडी मुख्यमंत्री अलंकृता बिचुकले असतील” असे अभिजीत बिचुकलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Back to top button