Pomegranate Benefits | डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Pomegranate Benefits | टीम महाराष्ट्र देशा: डाळिंब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर डाळिंबाचे नियमित सेवन करणे आपल्या त्वचेसाठी (Skin Care) उपयुक्त ठरू शकते. कारण डाळिंबामध्ये विटामिन सी, विटामिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम आणि फॉस्फरस यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेतात. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार होऊ शकते. त्याचबरोबर नियमित डाळिंब खाल्ल्याने त्वचेला पुढील फायदे मिळू शकतात.

त्वचेवरील पुरळ कमी होते (Reduces skin rashes-Pomegranate Benefits)

चेहऱ्यावर अतिरिक्त तेल निर्माण झाल्यामुळे त्वचेवर पिंपल्स यायला लागतात. डाळिंबाचे सेवन केल्याने त्वचेवरील तेल संतुलित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेवर खाज येण्याची समस्या देखील कमी होते. डाळिंबामध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला पुरळ, पिंपल्स यासारख्या समस्यांपासून दूर ठेवू शकतात.

त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात (Signs of skin aging are reduced-Pomegranate Benefits)

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. दररोज एक ग्लास डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.

त्वचा चमकदार राहते (Skin remains radiant-Pomegranate Benefits)

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने किंवा डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होऊ शकते. त्याचबरोबर डाळिंबाच्या मदतीने त्वचेवरील डाग देखील दूर होऊ शकतात.

डाळिंबाच्या मदतीने त्वचेच्या वरील समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर तेलगट त्वचेच्या समस्याला झुंज देत असाल तर तुम्ही पुढील पद्धतीने ग्लिसरीनचा वापर करू शकतात.

ग्लिसरीन आणि लिंबाचा रस (Glycerin and lemon juice-For Oily Skin)

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाऊ शकते.

ग्लिसरीन आणि गुलाब जल (Glycerin and rose water-For Oily Skin)

तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब जल फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा ग्लिसरीनमध्ये एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.

ग्लिसरीन आणि मुलतानी माती (Glycerin and Multani Mati-For Oily Skin)

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये ग्लिसरीन मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर साधारण दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने पिंपल्स आणि फ्रिंकल सारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या