Ashish Shelar | “शिव्या देणारं व्यक्तिमत्व सगळ्या व्यवस्थांना चोर अन् भो म्हणणार असेल तर…”

Ashish Shelar | मुंबई : सांगलीतील एका सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘शिवसेना कोणाच्या बापाची नाही. निवडणूक आयोग सांगतंय यांची शिवसेना. तुझ्या बापाची आहे का रे शिवसेना भोXXX?’, असं म्हणत संजय राऊतांनी निवडणूक आयोगाचा उल्लेख करत टीका केली आहे. त्यावरुन आज सभागृहात गोंधळ झाल्याचं पहायला मिळलं आहे. भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राऊतांच्या शिवीगाळ प्रकरणी विधानसभेत तक्रार केली आहे.

Ashish Shelar criticize Sanjay Raut 

“अध्यक्ष महोदय, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत विधिमंडळावर काय बोलले यावर आपण हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. अध्यक्ष महोदय, आज त्याच्या पुढची कळी झालेली आहे. एका सभेमध्ये बोलताना संजय राऊत हे असं म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणते शिवसेना त्यांची आहे, तुझ्या बापाची आहे का रे भो… पुढचं मी बोलत नाही”, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत खासदार संजय राऊत यांची तक्रार केली आहे.

“…म्हणून मी हा प्रश्न इथे उपस्थित करतोय”

“अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोगाने घोषित केलं म्हणून तुम्ही आणि आम्ही विधिमंडळाचे सदस्य आहोत. निवडणूक आयोगाने आपल्याला जाहीर केलं म्हणून आपण या सभागृहात आलो. निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन करुन आपल्या पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळालं. निवडणूक आयोग हा या सगळ्या प्रक्रियेचा आधार आहे. म्हणून मी हा प्रश्न इथे उपस्थित करतोय”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“अशी वक्तव्यं महाराष्ट्रातील जनतेला भडकवण्याचा प्रयत्न”

“शिवीगाळ करुन निवडणूक आयोगाचा उल्लेख. या मंडळाला चोरमंडळ म्हणणं ठीक. नॉटी काय याबद्दलचं उत्तर अजून द्यायचंच आहे. म्हणून या पद्धतीने शिव्या देणारं व्यक्तिमत्व सगळ्या व्यवस्थांवर चोर आणि भो असं म्हणणार असेल तर माझी विनंती आहे की, या विषयाची नोंद घ्यावी. अशा प्रकारचं वक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करणं याची नोंद आपण घ्यावी”, अशी विनंती आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-