Share

Eknath Shinde | “पोटनिवडणुकीत हरतात अन् आख्खं राज्य जिंकतात, हा भाजपचा इतिहास”

Eknath Shinde | मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. यावेळी विधानसभा सभागृहामध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक विषयावर बोलत असताना ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कंपाऊंडर असा उल्लेख केला आहे. त्यातच निवडणुकांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. … Read more

Published On: 

Eknath Shinde | मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. यावेळी विधानसभा सभागृहामध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक विषयावर बोलत असताना ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कंपाऊंडर असा उल्लेख केला आहे. त्यातच निवडणुकांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“पोटनिवडणुकीत हरतात अन् आख्खं राज्य जिंकतात, हा भाजपचा इतिहास”

“भाजप उत्तर प्रदेशच्या ४ पोटनिवडणुका हरले होते. लोकसभा हरले. पोटनिवडणुकीत हरतात आणि आख्ख राज्य जिंकतात, हा भाजपचा इतिहास आहे. आता महाराष्ट्रात तर मी पण आहे त्यांच्यासोबत. निवडणुकांमध्ये माझीही मास्टरी आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी भाजपचं कोडकौतुक केलं आहे.

“आम्हीच ओरिजनल शिवसेना”

“अजितदादा तुम्ही शपथ घेतली तेव्हा ठाण्यात तुमचे तर पुतळे जाळले, घोषणा केल्या हे सगळं आहे माझ्याकडे. माझे पुतळे जाळायला लोकांना फोन करायला लागले. तेव्हा लोक बाहेर आले. कारण आम्हीच ओरिजनल शिवसेना होतो ना. हे तुम्ही समजून घ्या. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी पसंत केलाय. कार्यकर्त्यांनी पसंत केलाय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

CM Ekanath Shinde Criticize Sanjay Raut

राजकारणात अजितदादांच्या कार्यक्रमांबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना कंपाउंडर म्हंटल आहे. “असे पोटदुखीचे प्रसंग यापुढे वारंवार येतील. त्यावर जालीम औषध शोधावं लागेल आपल्याला. आम्ही शोधलंय म्हणून आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केलाया. त्यामधे सगळे आहेत. डॉक्टर, कपाऊंडर पण आहे. नाही कंपाऊंजर नको. कंपाऊंडरच्या तुम्ही नादाला लागू नका”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही