Eknath Shinde | “आनंद घेऊ द्या, आनंद व्यक्त करू द्या…”; एकनाथ शिंदेंची कसबा निवडणुकीनंतरची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात पहायला मिळत होती. भाजपने कसब्यात पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटण्याचा प्रकार देखील झाला. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी उपोषण देखील केलं यामुळे ही पोटनिवडणूक अधिकच चर्चेत आली.

अशातच भाजप आणि शिंदे गटानं जीव ओतून लक्ष घातलं तरीही रवींद्र धंगेकर हे ११ हजार मतांनी विजयी झाले. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “त्यांना आनंद घेऊ द्या, आनंद करू द्या” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“पोटनिवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नाही. पोटनिवडणुकांचं गणित वेगळं असतं आणि सार्वत्रिक निवडणुकांचं गणित वेगळं असतं. यामुळे एका विजयानं एवढं हुरळून जायची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. आनंद घेऊ द्या, आनंद व्यक्त करू द्या” असं एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“ग्रामपंचायत निवडणुकांकडे पहावं” -CM Eknath Shinde

“ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देखील त्यांनी पाहावं. ७५०० ग्रामपंचायतीमधून ४५०० ग्रामपंचायतीत शिवसेना – भाजपचे सरपंच आहे. कसबा निवडणुकीत देखील मतदारांनी अधिक विश्वास दाखवला आहे. कार्यकर्त्यांनी देखील मेहनत घेतली. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.” अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली भावना व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-