Eknath Shinde | “त्या कंपाऊंडरच्या नादाला लागू नका”; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला

Eknath Shinde | मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. यावेळी विधानसभा सभागृहामध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक विषयावर बोलत असताना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

CM Ekanath Shinde criticize Sanjay Raut

राजकारणात अजितदादांच्या कार्यक्रमांबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना कंपाउंडर म्हंटल आहे. “असे पोटदुखीचे प्रसंग यापुढे वारंवार येतील. त्यावर जालीम औषध शोधावं लागेल आपल्याला. आम्ही शोधलंय म्हणून आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केलाया. त्यामधे सगळे आहेत. डॉक्टर, कपाऊंडर पण आहे. नाही कंपाऊंजर नको. कंपाऊंडरच्या तुम्ही नादाला लागू नका”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

“पोटनिवडणुकीत हरतात अन् आख्खं राज्य जिंकतात, हा भाजपचा इतिहास”

“भाजप उत्तर प्रदेशच्या ४ पोटनिवडणुका हरले होते. लोकसभा हरले. पोटनिवडणुकीत हरतात आणि आख्खं राज्य जिंकतात, हा भाजपचा इतिहास आहे. आता महाराष्ट्रात तर मी पण आहे त्यांच्यासोबत. निवडणुकांमध्ये माझीही मास्टरी आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी भाजपचं कोडकौतुक केलं आहे.

“अजितदादा तुम्ही शपथ घेतली तेव्हा ठाण्यात तुमचे तर पुतळे जाळले, घोषणा केल्या हे सगळं आहे माझ्याकडे. माझे पुतळे जाळायला लोकांना फोन करायला लागले. तेव्हा लोक बाहेर आले. कारण आम्हीच ओरिजनल शिवसेना होतो ना. हे तुम्ही समजून घ्या. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी पसंत केलाय. कार्यकर्त्यांनी पसंत केलाय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.