Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा (Temperature) पारा दिवसेंदिवस वाढत चालला होता. गेल्या महिन्यात थंडी संपून उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात 5 ते 6 मार्च रोजी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 7 ते 8 मार्च रोजी काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेतीतील काम उरकून घ्यावी असे, आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे.

विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy rain forecast in Vidarbha)

विदर्भामध्ये 5 मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज (Weather Update) आहे. तर विदर्भात 6 मार्चला सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर कोकणात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यासह देशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासांमध्ये जम्मू-काश्मीरमधील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात पुढील 24 तास हलक्या ते मध्यम स्वरूपाची हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वाढवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाच्या गडगडाची सुरुवात होऊ शकते. तर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडुन वर्तवण्यात आली आहे. होळीच्या दिवशी या ठिकाणी हवामान कोरडे राहू शकते. मात्र, डोंगराळ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button