Girish Bapat | “काही अडचण आली तर सांग मी मदत करेल”; गिरीश बापट यांचं रवींद्र धंगेकरांना मार्गदर्शन

Girish Bapat | पुणे : महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली. ही भेट महात्मा फुले संग्रहालयात झाली असून धंगेकर आणि बापट यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देखील केली. अशावेळी धंगेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते देखील होते. यावेळी गिरीश बापट यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. छान काम कर असा त्यांनी सल्ला दिला. “अडचण येईल तेव्हा मला सांग मी मदत करेल” असे देखील ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले; “मी कालच सांगितलं होतं. आज मी त्यांची भेट घेईल. आज भेट घेतली आहे. भाजप नेहमीच वेगळं राजकारण करत आहे. पण त्यांनी मला मदत करेन असे सांगितलं. पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या” असे देखील रवींद्र धंगेकर म्हणाले.

“…तर भाजपने संशय घेतला असता” – रवींद्र धंगेकर

“मी दोनवेळा बापट यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. ती निवडणूक खेळीमेळीत झाली. भाजपचं वेगळंचं राजकारण सुरू आहे. आम्ही कधीच कुरघोडी केली नाही. ते आजारी होते हे सर्वांना माहीत असेल. मला त्यांना भेटायचं होतं. निवडणूकीदरम्यान भेटायला आलो असतो तर भाजपने त्यांच्यावर संशय घेतला असता. त्यामुळे मी आधी निवडणूक जिंकून भाजपला दाखवून दिलं. त्यानंतरच गिरीश बापट यांना भेटायला गेलो.” असे नवनिर्वाचित कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात रॅली देखील काढली. त्याचप्रमाणे गिरीश बापट आजारी असताना देखील त्यांनी प्रचाराला येणार नाही असे पत्र सरकारला दिलं. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची मनधरणी केली. नाका-तोंडात नळ्या असून देखील अशाच स्थितीत प्रचारासाठी आणलं. त्यांचा फक्त प्रचारासाठी वापर केला गेला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.