Capsicum Benefits | शिमला मिरची खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Capsicum Benefits | टीम महाराष्ट्र देशा: शिमला मिरची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, प्रोटीन, फायबर आणि विटामिन सी आढळून येते. शिमला मिरचीचे सेवन केल्याने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर पचनक्रियाही मजबूत होते. बाजारामध्ये तीन रंगात शिमला मिरची उपलब्ध असते. यामध्ये हिरवा, लाल आणि पिवळ्या रंगाचा समावेश आहे. या तिन्ही मिरच्या आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. शिमला मिरचीचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

वजन कमी होते (Weight loss-Capsicum Benefits)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश केला पाहिजे. शिमला मिरचीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि पोटावरची अतिरिक्त चरबीही झपाट्याने कमी होते. शिमला मिरचीमध्ये थर्मोजेनेसिस आढळून येते, जे आपल्या शरीरातील कॅलरीज खूप जलद बर्न करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शिमला मिरची फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Capsicum Benefits)

शिमला मिरचीचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे शरीराला आजारांपासून दूर ठेवते. त्याचबरोबर शिमला मिरचीचे सेवन केल्याने तुम्ही संसर्गजन्य आजारांपासून दूर राहू शकतात. शिमला मिरची खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहू शकते.

अशक्तपणा दूर होतो (The weakness is removed-Capsicum Benefits)

तुमच्या शरीरात जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश केला पाहिजे. शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि विटामिन सी आढळून येते, जे शरीरातील आयरनची कमतरता पूर्ण करून थकवा दूर करते. त्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी शिमला मिरची फायदेशीर ठरू शकते.

कॅन्सरसोबत लढण्यासाठी उपयुक्त (Beneficial for cancer-Capsicum Benefits)

शिमला मिरचीमध्ये अँटिइफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. त्याचबरोबर शिमला मिरचीमध्ये ऍपिजेनिन, ल्युटोलिन, ल्युपेओल, क्वेर्सेटिन आणि कॅपसिएट, लाइकोपीन, बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन आणि बीटा-कॅरोटीन यांसारखे अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Capsicum Benefits)

शिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन कॅरेटिनाइड्स भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या