Kasba Election | Abhijeet Bichukale | कसबा पुणे : गेल्या काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर पसरली आहे. अभिजित बीचुकले यांच्या अर्जाने निवडणुकीत रंग आला. तसेच पोटनिवडणुकीत उमेदवारही तगडे होते. अशातच कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला आणि हेमंत रासने यांचा पराभव झाला. कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बीचुकले हे चर्चेचा विषय ठरले होते.
मराठी बिग बॉस तसेच हिंदी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले अधिकाधिक लोकांच्या घराघरापर्यंत पोहचले आहेत. याच कसबा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आपला अर्ज भरला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत त्यांनी श्रीगणेशा करत ४ मत पडली. त्यानंतर शेवटच्या राऊंडमध्ये एकूण ४७ मत पडली आहेत. यावेळी त्यांचं अर्धशतक देखील झालं नाही. यामुळे राजकीय वर्तुळात हशा उडला आहे.
एमपीएससीच्या आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांकडे जाऊन बीचुकलेंनी भेट घेतली. तसेच त्यांच्या पत्नी या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री असतील असं भाकीत देखील त्यांनी व्यक्त केले होते.
- UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Job Opportunity | नागपूर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | राज्यात पावसाचा अंदाज, उन्हाच्या झळा कमी होणार?
- Sanajy Raut | नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय – संजय राऊत