Curly Hair | कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी आणि मॉइश्चराइज करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Curly Hair | टीम महाराष्ट्र देशा: केसांची काळजी घेणे खूप आवश्यक असते. त्याचबरोबर केसांना मॉइश्चराइज ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे. विशेषता ज्या लोकांचे केस कुरळे आहे, त्यांना केसांची खूप काळजी घ्यावी लागते. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. कारण कुरळ्या केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. तुम्ही पण कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी पर्याय शोधत असाल, तर तुम्ही खालील उपायांचा अवलंब करून कुरळ्या केसांची काळजी घेऊ शकतात.

नियमित तेल लावा (Apply oil regularly-Curly Hair)

कुरळ्या केसांना वेळोवेळी तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित तेल लावल्याने केस गळती थांबते आणि केस मजबूत होतात. तुम्ही केस धुण्याच्या एक तास आधी केसांना तेल लावू शकतात. नियमित असे केल्याने केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात.

मॉइश्चरायझिंग शाम्पूने केस धुवा (Wash hair with moisturizing shampoo-Curly Hair)

केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग शाम्पूने केस धुणे खूप महत्त्वाचे आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी केस धुण्याच्या किमान एक तास आधी तुम्हाला केसांना तेल लावणे आवश्यक आहे. तेल लावून केस धुतल्यावर केस गळती थांबते आणि केसांच्या अनेक समस्या सहज दूर होतात.

कंडिशनर वापरा (Use conditioner-Curly Hair)

तेल लावल्यानंतर आणि केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणे खूप महत्त्वाचे आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा निघून जातो. त्यामुळे केसातील ओलावा टिकून ठेवण्यासाठी केसांना कंडिशनर लावणे खूप महत्त्वाचे आहे. केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरल्याने केस मॉइश्चराइज राहू शकतात. त्याचबरोबर केस कंडिशनर केल्याने केस गळती थांबू शकते.

कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पर्यायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने त्वचेला पुढील फायदे मिळू शकतात.

त्वचेवरील पुरळ कमी होते (Reduces skin rashes-Pomegranate Benefits)

चेहऱ्यावर अतिरिक्त तेल निर्माण झाल्यामुळे त्वचेवर पिंपल्स यायला लागतात. डाळिंबाचे सेवन केल्याने त्वचेवरील तेल संतुलित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेवर खाज येण्याची समस्या देखील कमी होते. डाळिंबामध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला पुरळ, पिंपल्स यासारख्या समस्यांपासून दूर ठेवू शकतात.

त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात (Signs of skin aging are reduced-Pomegranate Benefits)

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. दररोज एक ग्लास डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या