Weather Update | राज्यात आजपासून गारपिट होण्याची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. नुकतीच थंडी (Cold) संपून उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजपासून ते सहा मार्चपर्यंत मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची  शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज (Heavy rain is expected in these districts)

राज्यामध्ये नाशिक, सिन्नर, येवला, मालेगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणच्या बहुतांश भागांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे, आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

विदर्भामध्ये 5 मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज (Weather Update) आहे. तर विदर्भात 6 मार्चला सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर कोकणात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या बदलत्या हवामानामुळे (Weather Update) राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे करून घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेतीतील पिकांची काढणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे, देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.