Ravindra Dhangekar | ‘This Is Dhangekar’; चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात धंगेकरांचे बॅनर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravindra Dhangekar | कोल्हापूर : पुण्यातील कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धुळ चारली. या पराभवावरुन भाजपवर टीका होत असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही टीका होत आहे.

Chandrakant Patil criticize Ravindra Dhangekar

भाजपने कसब्यातून रवींद्र धंगेकरांना पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. मुख्यमंत्र्यांनी ‘रोड शो’ केला होता. या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रवींद्र धंगेकरांवर टीका केली होती.

भरसभेत “‘हू इज धंगेकर’, तो आमच्यासमोर टिकू शकत नाही”, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते. त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या. विजयानंतर त्यांनी कविताही व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना उत्तर दिलं. ‘धंगेकर नाऊ MLA’, असे आता सगळीकडे व्हायरल होत आहे.

‘Who Is Dhangekar’ त्यानंतर ‘This is Dhangekar’

ऐन प्रचारात त्यांनी ‘Who Is Dhangekar’ असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हाच धागा पकडून आता पुण्यामध्ये ‘This is Dhangekar’ बॅनर लागले आहेत. आता त्याच पद्धतीने कोल्हापुरातही लावून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यात आलं आहे. शहरातील कावळा नाका चौक परिसरात ‘This is Dhangekar’ म्हणत महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीची चंद्रकांत पाटलांवर टीका

“चंद्रकांत पाटील यांनी प्रचारामध्ये सर्वसामान्य घरातील असलेल्या धंगेकर यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. म्हणूनच हे होर्डिंग लावल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून घेतात आणि दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात”, अशी टीकाही त्यांनी केली. 2024 मध्येही अशाच पद्धतीचे चित्र पाहायला मिळेल, असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या-