Chandrashekhar Bawankule | “मला वाटतं पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील”; बावनकुळेंचा खोचक सल्ला

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांच्या रुपाने कसब्यात विजय मिळवला. यानंतर भाजप विरोधातली नाराजी मतदारांनी व्यक्त केल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या टिप्पणीवर भाजपकडून सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या वक्तव्यावरून शरद पवारांना खोचक सल्ला दिला आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

“चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही अधिक आहोत. आम्ही 51 टक्क्यांची लढाई जिंकली आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप 51 टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे 4 सल टक्के मागे पडलो आहोत. ही 4 टक्के मतं भरून काढणं ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही आमच्याकडून चुकलं असेल तर ते दुरुस्त करू”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule reaction on Sharad Pawar’s statement

“मला वाटतं शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीय आहे. राहुल गांधींनी ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण उलट पक्ष कमी झाला. तीन राज्य हातातून गेले. शरद पवार जे सांगत आहेत ते कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सांगत आहेत”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कसबा पोटनिवडणुकीतील निकालांचा उल्लेख करत भाजपला इशारा दिला आहे. “हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजप मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतंय”, असा इशारा शरद पवारांनी यावेळी बोलताना भाजपला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button