Ajit Pawar | “…म्हणून अखेरच्या दिवशी नाना काटेंना उमेदवारी”; अजित पवारांनी सांगितलं उमेदवारीचं राजकारण

Ajit Pawar | मुंबई : राज्यात सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेवारीवरुन राजकारणात मोठं रणकंद पहायला मिळालं. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीमध्ये प्रचंड खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे ( Rahul Kate ) यांचं नाव चर्चेत होतं.

‘आयात झालेल्या नेत्याला उमेदवारी नको म्हणून…’

‘आयात केलेल्या नेत्याला उमेदवारी नको’, असं म्हणत पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला. त्यामुळे अखेर शेवटच्या क्षणी अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या मर्जीतील पदाधिकारी नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. अखेरच्या क्षणी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पक्षांतर्गत प्रश्नाबाबत बाहेरचे लोक आम्हाला विचारु शकत नाहीत. आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतो”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“आमचा अधिकार आम्ही वापरला” -Ajit Pawar

“बातम्या सगळ्याच खऱ्या नसतात. तो अधिकार आमचा आहे. ती जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर आमचे राष्ट्रीय नेते ज्यांनी अनेक 55 वर्षात निवडणुका लढवले आहेत, अनेकदा सरकार स्थापन केले आहेत, अनेकदा देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे अशा शरद पवारांनी सल्ला-मसलत करुन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काही विचार केला असेल. तो आमचा अधिकार आहे ना? तो आम्ही वापरला”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी ( Ajit Pawar ) दिली आहे.

“आमच्याकडे 11 नावं होती. अकरा-बारा नावांमध्ये एकच फायनल होणार होतं. तुम्ही मीडियाने ठरवलं की ए नाव कदाचित निश्चित होईल, पण बी नाव निश्चित झालं. पण तुमचा अंदाज चुकला. तुमच्या अंदाजाशी मला काय घेणं-देणं आहे?”, असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

“उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray ) नाना काटेंना पाठिंबा”

“याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागितलं की, माझे शिवसैनिक आणि पदाधिकारी हे नाना काटे यांच्यासाठी काम करतील. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तिथे त्या पद्धतीने मेसेज दिला आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येईल, असं मला वाटत नाही”, असं नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्याबाबत बोलताना अजित पवारांनी सांगितलं आहे.

“कधीकधी तिरंगी लढाईने फायदा”

“कधीकधी तिरंगी लढाईने फायदाही होतो. तोटाही होते. काल फॉर्म भरले आहेत, छाननी होईल. जवळपास 40 लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यापैकी अनेक फॉर्म बाद होतील. ज्यावेळेस तिथले निवडणूक अधिकारी आता चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एवढे उमेदवार उभे आहेत असं घोषित करतील त्यावेळेस खरं चित्र समोर येईल”, असे अजित पवार ( Ajit Pawar )  सांगितले आहे.

दरम्यान, भाजपने (BJP) ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केलीय. पण महाविकास आघाडीने भाजपच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. महाविकास आघाडीकडून कसबा पेठच्या जागेसाठी काँग्रेस रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या नाना कोटे ( Nana Kate )यांना उमेदवारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-