Narendra Modi | “ईडीने विरोधकांना एकत्र आणलं, ईडीचे आभार मानले पाहिजेत”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi | नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर गंभीर आरोप नेहमी केले जातात. या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या आदेशानुसार काम करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातो. याच मुद्द्यावरुन आज लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांची खिल्लीही उडवल्याचे पहायला मिळाले आहे.

“ईडीने विरोधकांना एकत्र आणलं” (ED brought the opposition together)

“अध्यक्ष महोदय, सभागृहात भ्रष्टाचार विरोधात तपास करणाऱ्या तपास यंत्रणांबद्दल बरंच काही बोललं गेलं. मी एक पाहिलं की, अनेक विरोधी पक्ष इतरांच्या सुरात सूर मिसळत होते. मिले तेरा मेरा सूर” त्यांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजेत. मला वाटत होतं देशाची जनता, देशाच्या निवडणुकीचे निकाल अशा लोकांना जरुर एका मंचावर आणेल. पण तसं झालं नाही. पण या लोकांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजेत. कारण ईडीच्या कारणास्तव ते एकाच मंचावर आले आहेत”, असा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे.“ईडीने या लोकांना एका मंचावर आणलं आहे. त्यासाठी जे काम देशाचे मतदार करु शकले नाहीत, ते ईडीने केलं”, असा चिमटा नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना काढला आहे.

“आरोपांशिवाय काहीच नाही” (Narendra Modi comment on Opposition)

“लोकशाहीत टीका-टिप्पणीला खूप महत्त्व असल्याचं मी मानतो. मी नेहमी मानतो की, भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. आमच्यामध्ये अनेक युगांपासून लोकशाही आहे. त्यामुळे टीका-टिप्पणी या लोकशाहीसाठी चांगली आहे. पण दुर्दैवाने कुणीच मेहनत करुन पुढे येत नाही. कुणीतरी अभ्यास करुन टीका करेल ज्यामुळे देशाला फायदा होईल, याची मी वाट पाहतोय. पण गेल्या नऊ वर्ष टीकांनी आरोपांमध्ये घालवले. आरोपांशिवाय काहीच नाही”, असा दावा मोदींनी केला.

नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका (PM Narendra Modi Criticize Congress) 

‘2004 ते 2014 हे दशक स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक घोटाळ्यांचे दशक होते. त्याच वेळी, 10 वर्षे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले सुरूच होते. अनोळखी वस्तूला हात लावू नका ही माहिती पुढे जात राहिली. 10 वर्षात काश्मीरपासून ईशान्येपर्यंत फक्त हिंसाचार झाला. जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज इतका कमकुवत होता की जग ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या निराशेचे कारण म्हणजे आज जेव्हा देशातील 140 कोटी जनतेची क्षमता फुलत आहे. 4 ते 14 पर्यंत त्याने ती संधी गमावली आणि प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर केले आहे.

“हार्वर्डची मोठी क्रेझ”

“मी अनेकदा ऐकले आहे. इथल्या काही लोकांना हार्वर्डची मोठी क्रेझ आहे. कोरोनाच्या काळात भारताच्या विनाशावर हार्वर्डमध्ये केस स्टडी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. आणि मग काल सभागृहात हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाविषयी चर्चा झाली, पण गेल्या काही वर्षांत खूप चांगला आणि महत्त्वाचा अभ्यास झाला, त्याचा विषय होता-भारताच्या काँग्रेस पक्षाचा उदय आणि पतन”, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-