Ajit Pawar | “अरे बापरे! 440 व्होल्टचा करंट म्हणजे मी मरुन जाणार?”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | पुणे : राज्यात पुणे शहराच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड येथे पार पडलेल्या भाजपच्या एका बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला

“येत्या 26 तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की 440 व्होल्टचा करंट लागला पाहीजे. पुन्हा अजित पवारांनी चिचंवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या.”, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. बावनकुळेंच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

अजित पवारांची प्रतिक्रिया

अरे बापरे… 440 व्होल्टचा करंट म्हणजे मी मरून जाणार… एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा काय जगू शकतो? आता माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना आता श्रद्धांजली अर्पण करावी लागेल की काय?”, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला आहे.

“त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात तारतम्य ठेवा. आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. उगीच आपल्याला बोलण्याची संधी मिळाली म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करू नका. काहीतरी तारतम्य ठेवा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.