Sanjay Raut | “चोर रस्त्यात सापडले तर लोक कपडे काढून मारतात, ही चोरी त्यांना महागात पडेल”

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत आज कोकण दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर त्यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत ‘मातोश्री’बाहेर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“ही चोरी त्यांना महागात पडेल”

“कुणीही जाणार नाही. आम्ही सगळे फक्त धनुष्यबाण जे चोरणारे लोकं आहेत त्यांच्या तपासाला लागलेलो आहोत. ही चोरी त्यांना महाग पडेल. चोरांना अनेक ठिकाणी रस्त्यात पकडून मारलं जातं. चोर हातात सापडला तर त्यांना रस्त्यावर लोकं कपडे काढून मारतात. धनुष्यबाणाच्या चोरांनासुद्धा अशाप्रकारे राज्याची जनता रसत्यावर पकडून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

“आमच्या मंदिरातला शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण चोरीला गेला”- Sanjay Raut

“मी कोकणच्या दौऱ्यावरुन आलो आहे. आम्ही आता चर्चा केली. शिवसेनेच्या धनुष्यबाणाची चोरी झालीय. ते चोर कोण आहेत? अलिकडच्या काळात महाराष्ट्रात मंदिरांवर दरोडे पडत आहेत. मंदिरांचे सोन्याचे कळस चोरी होत आहे. मूर्त्या चोरीला जात आहेत. त्याचपद्धतीने आमच्या मंदिरातला शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण चोरीला गेला”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“धनुष्यबाण चोरणाऱ्यांचं वस्त्रहरण करु”

“आमच्या धनुष्यबाणाची चोरी झालीय. या चोरीत कोण-कोण सामील आहे, दिल्लीतले बडे लोक कोण आहेत, इथले कोण आहेत, त्याबद्दल आम्ही तपास करु. तसेच चोरांबद्दलची माहिती आम्ही जनतेलासुद्धा देऊ. धनुष्यबाण चोरणारे, पक्षावर दरोडा टाकणारे कोण आहेत? चोरांचे सरदार कोण आहेत? याबद्दल लवकरच खुलासा करु. आता दुसऱ्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. ती होऊन जाईल. पण त्याआधी धनुष्यबाण चोरणाऱ्यांचं वस्त्रहरण करु”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe