Share

Uddhav Thackeray | “चोर अन् चोरबाजारातील मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभं राहू”- उद्धव ठाकरे

🕒 1 min read Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच शिवसैनिकांमध्ये जाऊन भाषण केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’च्या बाहेरच गाडीतून कार्यकर्त्याना आव्हान केलं आहे. शिंदे गटाला गद्दार म्हणत शिवसेना संपणार नाही असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच शिवसैनिकांमध्ये जाऊन भाषण केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’च्या बाहेरच गाडीतून कार्यकर्त्याना आव्हान केलं आहे. शिंदे गटाला गद्दार म्हणत शिवसेना संपणार नाही असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.

“त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला”

“गद्दारांना गाडून शिवसेना वाढवा, कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकीत या लोकांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे. या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला आहे. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“त्यांच्या कितीही पिढ्याा उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही”- Uddhav Thackeray

“तुम्ही चिडलेला आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष नसेल की त्यांच्यावर हा आघत कोसळला नसेल. भाजप नेते आणि पंतप्रधानां वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“यांना आता ‘ठाकरे’ नाव पण पाहिजे” 

“माझं आव्हान आहे. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील. न्यायामूर्ती झाले. त्यांनी गुलाम अवतीभवती ठेवले आहे. गुलामांना आव्हान आहे. शिवसेना कुणाची. शिवसेना ही जनतेला ठरवू द्या. यांचा डाव सुरू आहे. यांना ‘ठाकरे’ नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण ठाकरे कुटुंब नको. त्यावेळी मोदींनी नाव घेऊन मते मागत होता. तेव्हा युती होती. एक जमाना होता लोक मोदींचे मुखवटे घालू यायचे. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मते मागावी लागत आहे”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

“उद्या मशालही काढतील” (Uddhav Thackeray Criticize Eknath Shinde)

“मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने सुरू आहे. उद्या मशालही काढतील. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते”, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या