Shivsena | निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे आणि शिंदे गटाने सोशल मीडियावर केले ‘हे’ बदल

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यातच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा दोन्हीही एकनाथ शिंदेना दिले त्यानंतर लगेच ठाकरे आणि शिंदे गटाकडून सोशल मीडियावर काही बदल केल्याचे दिसून आले आहेत.

शिंदे गटाने काय बदल केला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर हे धनुष्यबाण केले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, बंदरे आणि खणिकर्म मंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, या मंत्र्यांनी आपले प्रोफाईल पिक्चर बदलले आहे.

ठाकरे गटाने काय बदल केला?

शिवसेनेच्या ट्विटर हॅन्डलचे नाव एडीट करुन ‘ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray’, असे करण्यात आले आहे. तसेच प्रोफाईल फोटो बदलला असून मशाल चिन्हाचा वापर केला आहे.

Uddhav Thackeray

“आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार”

“लोकशाहीच्या दृष्टीने घातक, लोकशाहीला श्रद्धांजली वाहून देशात बेबंदशाही सुरू असल्याचे सांगा. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. न्यायालयात लढाई सुरू असताना आयोगाने निर्णय देवू नये, मात्र आता धनुष्यबाण चोरलेला आहे. हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे “, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने शेण खाल्लं

“निवडणूक आयोगाने शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्यांच्या ताब्यात जाणार नाहीत. आमचे शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती जागा शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करेल. शिवसेना पक्ष आमचाच आहे. खुर्चीवर बसलेल्या काही लोकांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेची शाखा, शिवसेनेची संपत्ती आणि हजारो लाखो शिवसैनिक आमच्या बरोबरच राहतील”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button